अणूचे आकारमान म्हणजे काय ते सांगून गण व आवर्तामध्ये कशा प्रकारे तो बदलतो ते लिहा

अणूचे आकारमान म्हणजे काय ते सांगून गण व आवर्तामध्ये कशा प्रकारे तो बदलतो ते लिहा

प्रश्न

 अणूचे आकारमान म्हणजे काय ते सांगून गण व आवर्तामध्ये कशा प्रकारे तो बदलतो ते लिहा

उत्तर

 

 

i) अणूचे आकारमान हा द्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे. अणूचा आकार हा त्याच्या त्रिज्येवरून ठरवला जातो. अणूमध्ये अणुत्रिज्या म्हणजे अणूचे केंद्र व बाह्यतम कक्षा यांतील अंतर होय. ही त्रिज्या पिकोमीटर (pm) मध्ये मोजली जाते. (1pm = 10-12 m). अणूचा आकार हा त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन कवचांच्या संख्येवर अवलंबून असतो. कवचांची संख्या जितकी जास्त तितका आकार मोठा.

ii) गणामध्ये खाली जाताना अणूचे आकारमान वाढत जाते. कारण गणात खाली जाताना चीन नवीन कवचाची भर पडत जाते. त्यामुळे बाहयतम इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्यातील अंतर वाढत जाते. याचा परिणाम म्हणजे केंद्रकीय प्रभार वाढूनसुद्धा अणूचे आकारमान वाढत जाते.

iii) आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी कमी होत जाते. कारण एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक एक-एकाने वाढत जातो, म्हणजेच केंद्रावरील घनप्रभार एकेक एककाने वाढत जातो. मात्र त्याप्रमाणे भर पडलेला इलेक्ट्रॉन हा असलेल्या बाह्यतम कवचामध्ये जमा होतो. वाढीव केंद्रकीय धनप्रभावामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिक प्रमाणात ओढले जातात व त्यामुळे आकारमान कमी होते.

Previous Post Next Post