देशातील वाहतूक मार्गाचा विकास हा देशाच्या विकासाचा एक निर्देशांक आहे
उत्तर :
हे विधान बरोबर आहे.
कारण
i) वाहतूक ही एक पायाभूत सुविधा आहे. वाहतूक व्यवस्थेतील विकास हे देशाच्या किंवा प्रदेशाच्या विकासाचे एक मानक मानले जाते.
ii) वाहतूक व्यवस्थेतील सुधारणांमुळे प्रदेशात मालाची व प्रवाशांची चलनक्षमता वाढते, तसेच उद्योगधंदे आणि बाजारपेठा यांचा विकास होतो.
iii) आर्थिक विकासाला गती प्राप्त होते. दरडोई उत्पन्न व स्थूल देशांतर्गत उत्पादन यामध्येही वाढ होत जाते. यावरून हे सिद्ध होते की, देशातील वाहतूक मार्गांचा विकास हा देशाच्या विकासाचा एक निर्देशांक आहे.