प्रश्न | टिपा लिहा गियाना उच्चभूमी |
उत्तर | i) गियाना उच्चभूमीचा मुख्य भाग व्हेनेझुएला देशात आहे. या उच्चभूमीचा पूर्वेकडे फ्रेंच गियानापर्यंत विस्तार आढळतो. ब्राझीलमध्ये या उच्चभूमीचा तुलनेने कमी उंचीचा भाग आढळतो. ii) गियाना उच्चभूमी ही ब्राझीलच्या उत्तरेकडील रोमाईमा, पारा आणि आमापा या राज्यांत विस्तारलेली आहे. iii) ब्राझीलमध्ये सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लीना हे ब्राझील व व्हेनेझुेएला या देशांच्या सीमेवर आहे. या शिखराची उंची ३०१४ मीटर आहे. iv) गियाना उच्चभूमी (ढालक्षेत्र) व ब्राझील उच्चभूमी (ढालक्षेत्र) एकत्रितरीत्या दक्षिण अमेरिका खंडातील गाभाक्षेत्रे मानली जातात. |