प्रश्न | टिपा लिहा भारतातील काटेरी व झुडपी वने |
उत्तर | i) भारतातील ज्या प्रदेशांत दीर्घकाळ कोरडा उन्हाळा व ५०० मिमीपेक्षा कमी पर्जन्य होतो, अशा प्रदेशांत काटेरी व झुडपी वने आढळतात. ii) भारतातील गुजरात व राजस्थान राज्यांत व राजस्थानमधील थरच्या वाळवंटी प्रदेशात काटेरी व झुडपी वने आढळतात. iii) भारतातील काटेरी व झुडपी वनांमध्ये खैर, बाभूळ, खेजड़ी इत्यादी वनस्पती व कोरफड, घायपात इत्यादी निवडुंगाचे प्रकार आढळतात. iv) बाष्पीभवनामुळे पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये यासाठी या वनांतील वनस्पतींची पाने आकाराने लहान असतात. |