टिपा लिहा हरित क्रांती

टिपा लिहा हरित क्रांती

 

प्रश्न 

टिपा लिहा हरित क्रांती


 उत्तर 

 

i) अनेकविध पद्धती वापरून कमी शेतजमिनीत जास्तीत जास्त धान्योत्पादन करण्याच्या पद्धतीला हरित क्रांती असे म्हणतात.

ii) भारतातील हरित क्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन हे आहेत. तसेच डॉ. नॉर्मन बोलॉग यांनी अमेरिकेत हरित क्रांती घडवून आणली. हरित क्रांती होण्याअगोदर भारताच्या अफाट लोकसंख्येला पुरेल असे अन्नधान्य उपलब्ध नव्हते. 

iii) अन्नधान्याची गुणवत्ता आणि प्रमाण यांत कमतरता होत्या. परंतु हरित क्रांती झाल्यानंतर कृषी संशोधनाकडे विशेष लक्ष दिले गेले. गहू व तांदूळ यांच्या सुधारित छोट्या वाणाचा वापर, खते व कीडनाशकांचा सुयोग्य वापर आणि जलव्यवस्थापन या बार्बीमुळे अन्नोत्पादनात भरघोस वाढ झाली. या साऱ्या प्रयत्नांमुळे भारतात धान्याची सुबत्ता आली आहे.



Previous Post Next Post