संकल्पना स्पष्ट करा राष्ट्रवादी इतिहासलेखन

संकल्पना स्पष्ट करा राष्ट्रवादी इतिहासलेखन

प्रश्न 

संकल्पना स्पष्ट करा राष्ट्रवादी इतिहासलेखन

 उत्तर 


i) एकोणिसाव्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षणपद्धती सुरू झाली. या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयीची जाण आली. आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहासलेखन केले त्या लेखनास 'राष्ट्रवादी इतिहासलेखन' असे म्हणतात.

ii) या राष्ट्रवादी इतिहासलेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रहदूषित इतिहासलेखनाला विरोध केला.

iii) भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केले. 

iv) राष्ट्रवादी इतिहासलेखनामुळे ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यास प्रेरणा मिळाली; तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली.


Previous Post Next Post