टिपा लिहा व्यसनाधीनता (Addiction)

टिपा लिहा व्यसनाधीनता (Addiction)

 

प्रश्न 

टिपा लिहा व्यसनाधीनता (Addiction)


 उत्तर 

 

i) पौगंडावस्थेतील कुमारवयीन मुलां-मुलींवर समवयस्कांचा प्रभाव जास्त प्रमाणात पडतो. मोठ्यांचे ऐकण्यापेक्षा मित्र-मैत्रिणींचे चुकीचे सल्ले ऐकले जातात. 

ii) लहान वयातच तंबाखू, गुटखा, सिगारेट, अमली पदार्थ व मदय यांची चव घेतली जाते. व्यसनांची सुरुवात नकळत होते.

iii) समवयस्कांचा आग्रही प्रभाव किंवा उच्च राहणीमानाचे खोटे प्रतीक या दोन बाबी व्यसने सुरू व्हायला कारणीभूत असतात. कधी आजूबाजूच्या मोठ्यांचे अनुकरण म्हणून मुले व्यसनात अडकतात.

iv) यांपैकी बरेचसे पदार्थ दीर्घकालीन परिणाम करतात. अशा पदार्थांनी कायमस्वरूपी हानी होते. तंबाखूजन्य पदार्थ आणि ड्रग्ज (अमली पदार्थ) यांमुळे मानवी चेतासंस्था, स्नायुसंस्था, हृदय यांच्यावर हानिकारक परिणाम होतात. तंबाखूजन्य पदार्थांमुळे तोंड, घसा, श्वासनलिका, फुप्फुसे अशा अवयवांचा कर्करोग होण्याची शक्यता असते.



Previous Post Next Post