कोश म्हणजे काय ते सांगून कोशाची आवश्यकता स्पष्ट करा

कोश म्हणजे काय ते सांगून कोशाची आवश्यकता स्पष्ट करा

प्रश्न

 कोश म्हणजे काय ? ते सांगून कोशाची आवश्यकता स्पष्ट करा

उत्तर

 

 

शब्दांचा, विविध माहितीचा वा ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह म्हणजे 'कोश' होय. शब्दांचा व ज्ञानसंवर्धन करणाऱ्या माहितीचा संग्रह म्हणजे कोश" होय.

कोशाची आवश्यकता :

i) कोशामुळे ज्ञान वाचकांपर्यंत पोहोचून त्याची जिज्ञासापूर्ती होते.

ii) कोशांमधून ज्ञान, माहिती व संदर्भ सहज आणि सोप्या पद्धतीने मिळत असल्याने वाचकाला त्याचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते. 

iii) कोश संशोधक व अभ्यासकांना त्यांच्या विषयाचे पूर्वज्ञान व माहिती देतात, त्यामुळे त्यात भर घालण्याची प्रेरणाही कोश देतात.

iv) कोशवाङ्मय हे राष्ट्राच्या सांस्कृतिक, बौद्धिक प्रगतीचे प्रतीक असतात. म्हणून समाजाचा बौद्धिक स्तर उंचावण्यासाठी प्रत्येक भाषिक समाजात कोशवाङ्मय निर्माण होण्याची गरज असते.

Previous Post Next Post