ईव्हीएम मशीनच्या वापराचे कोणते फायदे झाले

ईव्हीएम मशीनच्या वापराचे कोणते फायदे झाले

प्रश्न

 ईव्हीएम मशीनच्या वापराचे कोणते फायदे झाले ?

उत्तर

 

 

मतपत्रिकांऐवजी बॅटरीवर चालणाऱ्या ईव्हीएम मशीनच्या वापरामुळे देशाला पुढील फायदे झाले -

i) प्रत्येक निवडणुकीत मतपत्रिकांसाठी लागणाऱ्या कित्येक टन कागदाची बचत झाली. कागद तयार करण्यासाठी लागणाऱ्या लाकडाची बचत झाल्याने तेवढी वृक्षतोड थांबली, त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण झाले.

ii) मशीनवर उपलब्ध असलेल्या NOTA च्या सोईमुळे कोणत्याही उमेदवाराला मत दयायचे नसेल, तर हा पर्याय उपलब्ध झाला.

iii) दिव्यांग व्यक्तींनाही मतदान करणे सोईचे झाले. 

iv) निवडणुकांचे निकाल लवकर लागू लागल्याने कर्मचारी, पोलीस व एकूण व्यवस्थेचा ताण कमी झाला.

Previous Post Next Post