रशियन राज्यक्रांतीची कारणे लिहा

रशियन राज्यक्रांतीची कारणे लिहा

रशियन राज्यक्रांतीची कारणे लिहा. 

उत्तर 

१९१७ साली झालेल्या रशियन राज्यक्रांतीची कारणे पुढीलप्रमाणे आहेत :

१) जुलमी राजवट : क्रांतिपूर्व काळात रशियात रोमॅनोव्ह घराण्याची तीन शतके अनियंत्रित सत्ता होती. त्यांचे साम्राज्यवादी होते. उदारमतवादी विचारांना त्यांचा विरोध होता. 

२) रासपुतीन प्रकरण : क्रांतिकाळातील झार दूसरा निकोलस व झरिना यांच्यावर रासपुतीन या ढोंगी व लाचखोर महंताचा प्रभाव होता. राजदरबारातील सर्व नेमणुका त्याच्या संमतीने होत. त्यामुळे राज्यात अनागोंदी माजली. 

३) निहिलिस्ट व अन्य विचारवंतांचे जागृतीचे कार्य : निहिलिस्ट आणि त्याचबरोबर दोस्तोवस्की, टॉलस्टॉय, पुश्किन, गाॅर्की यांसारखे विचारवंत हे उदारमतवादी व मानवतावादाचा पुरस्कार करणारे होते. त्यांनी सरकारवर व समाजव्यवस्थेवर कडक टीका करून वैचारिक जागृती निर्माण करण्याचे कार्य केले. 

४) प्रत्येक वर्गात असंतोष : (अ) शेतकरी वर्ग : रशियन अर्थव्यवस्थेचा पाया असलेली शेती मागास अवस्थेत होती. अन्नधान्याच्या वाढत्या मागणीमुळे शेतकऱ्यांनी केलेल्या जादा जमिनीची मागणी झारने फेटाळली.  (ब) कामगार वर्ग : अपुरे वेतन, कामाचे दीर्घ तास, असुरक्षितता आणि निकृष्ट राहणीमान यांमुळे कामगार वर्गात अंसतोष होता. (क) सैनिक :भ्रष्टाचारी व अकार्यक्षम लष्करी अधिकाऱ्यांमुळे सैनिकांमध्ये असंतोष होता.  (ड) इतर वर्ग : ज्यू, पोलिश, फीन व अन्य अल्पसंख्याक समाजातही झारविषयी असंतोष होता. 

५) पहिल्या महायूद्धातील पराभव : अपुऱ्या तयारीनिशी पहिल्या महायुद्धात उतरलेल्या रशियाचा पूर्व आघाड्यांवर पराभव होऊ लागला. युद्धातील चुकीचे डावपेच, अनागोंदी कारभार, लष्करातील बेइमानी व बेशिस्त यांमुळे झालेल्या पराभवामुळे राजेशाहीविरोधी वातावरण तयार होऊ लागले. 

६) पेट्रोग्राडचा संप : फेब्रुवारी १९१७ मध्ये पेट्रोग्राडच्या केलेल्या संपाला सैनिकांनीही पाठिंबा दिला. त्यामुळे १५ मार्च १९१७ रोजी झार दूसरा निकोलस याला सत्तात्याग करावा लागला.


Previous Post Next Post