निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा

निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा

प्रश्न

 निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा.

उत्तर

 

 

i) भारतीय निवडणूक आयोग या यंत्रणेत एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य दोन निवडणूक आयुक्त असतात. तिघांनाही समान अधिकार असतात.

ii) या आयुक्तांची निवड राष्ट्रपतींकडून होते. प्रशासकीय सेवेतील अनुभवी व्यक्तींची या पदासाठी निवड केली जाते.

iii) संसदेच्या आणि विधिमंडळाच्या प्रतिनिधींच्या निवडणुका निष्पक्ष आणि खुल्या वातावरणात घेण्याची जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्ताची असते. 

iv) निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आयुक्तांना सहजासहजी वा राजकीय कारणासाठी पदभ्रष्ट करण्याचा अधिकार संविधानाने कोणालाही दिलेला नाही.

Previous Post Next Post