डी.एन.ए. फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय ? याचा वापर कोठे केला जातो ?

डी.एन.ए. फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय ? याचा वापर कोठे केला जातो ?

प्रश्न

 डी.एन.ए. फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय ? याचा वापर कोठे केला जातो ?

किंवा

डी.एन.ए. फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय ते थोडक्यात स्पष्ट करा. या तंत्राचा वापर कोणकोणत्या ठिकाणी होतो ? दोन उदाहरणे दया.

उत्तर

 

 

i) जसे प्रत्येक व्यक्तीच्या हाताचे ठसे निरनिराळे आणि ठरावीकच असतात, त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या डी.एन.ए. रेणूतील न्युक्लिओटाइडची क्रमवार रचना ठरावीकच असते.

ii) या डी. एन. ए. तील न्युक्लिओटाइड रचनेवर अवलंबून त्या त्या व्यक्तींची नेमकी ओळख पटवता येते. या तंत्राला डी.एन.ए. फिंगरप्रिंटिंग असे नाव आहे. 

iii) या तंत्राचा मुख्य वापर गुन्हेनिदान शास्त्रामध्ये केला जातो. गुन्हेगाराची ओळख पटवण्यासाठी हे तंत्र वापरतात.

iv) तसेच बालकाच्या अचूक पालकांची ओळख पटवण्यासाठी आई, वडील व बालक या तिघांच्याही डी.एन.ए.च्या नमुन्यांची तपासणी करण्यात येते.

Previous Post Next Post