लोकशिल्पकला याविषयी माहिती लिहा

लोकशिल्पकला याविषयी माहिती लिहा

प्रश्न

 लोकशिल्पकला याविषयी माहिती लिहा.

उत्तर

 

 

i) लोककलांची परंपरा अश्मयुगीन काळापासून चालू आहे. हड़या संस्कृतीत मातीची शिल्पे, देवतांच्या मूर्ती तयार केल्या जात असत. आजही बंगाल, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान अशा अनेक राज्यांत मातीच्या गणेशाच्या, गौरीच्या मूर्ती तयार केल्या जातात. 

ii) मातीची खेळणी, बैल तयार करण्याची पद्धत हडप्पा संस्कृतीत होती. 

iii) पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केलेले लाकडी खांब आणि वीरगळ यांवर शिल्पे कोरली गेलेली पाहावयास मिळतात.

अशा रितीने धार्मिक कारणांतून व मनोरंजनासाठी तयार केल्या जाणाऱ्या कारागिरीतून लोकशिल्पकला टिकून राहिली व तिचा विकासही झाला.


Previous Post Next Post