भारतातील शेती व्यवसायाचे स्वरूप स्पष्ट करा

भारतातील शेती व्यवसायाचे स्वरूप स्पष्ट करा

प्रश्न

 भारतातील शेती व्यवसायाचे स्वरूप स्पष्ट करा

उत्तर

 

 भारतातील शेती व्यवसायाचे स्वरूप पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते :

I) वैशिष्ट्ये : 

i) भारतात शेती हा व्यवसाय प्राचीन काळापासून चालत आला आहे.

ii) भारतातील एकूण भूभागाच्या सुमारे ६० टक्के भूभाग लागवडीखाली आहे.

iii) भारतातील बहुतांश शेती ही निर्वाह शेती आहे. 

iv) ब्राझीलच्या तुलनेत भारताच्या स्थूल अंतर्देशीय उत्पादनात शेतीचे योगदान तुलनेने अधिक असल्याचे आढळते.

v) ब्राझीलच्या तुलनेत भारतातील तुलनेने अधिक मनुष्यबळ शेती व्यवसायात गुंतलेले आढळते.

II) व्यवसायास चालना देणारे घटक: 

भारतातील उत्तरेकडील विस्तीर्ण मैदाने, नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशातील सुपीक मृदा, वर्षभरात दीर्घ कालावधीसाठी राहणारे अनुकूल हवामान, विविध प्रदेशांतील हवामानातील भिन्नता इत्यादी घटकांमुळे भारतात शेती व्यवसायास मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली आहे.

III) उत्पादित होणारी विविध पिके : 

भारतात ठिकठिकाणी भात, गहू, ज्वारी, बाजरी, मका इत्यादी खाद्यान्न पिकांचे व चहा, कॉफी, कापूस, रबर, ताग इत्यादी नगदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. 

IV) परकीय चलन प्राप्ती: 

भारतात मिरी, लवंग, तमालपत्र इत्यादी विविध मसाल्यांचे पदार्थ, आंबा, द्राक्ष, सफरचंद इत्यादी विविध प्रकारची फळे, भाजीपाला इत्यादी पिकांचेही मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. भारतातील कृषिमालाची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते व त्यातून भारतास मोठ्या प्रमाणावर परकीय चलन प्राप्त होते.

Previous Post Next Post