थंड प्रदेशात गोठलेल्या तलावातसुद्धा मासे जिवंत राहू शकतात

थंड प्रदेशात गोठलेल्या तलावातसुद्धा मासे जिवंत राहू शकतात

प्रश्न

 थंड प्रदेशात गोठलेल्या तलावातसुद्धा मासे जिवंत राहू शकतात.

उत्तर

 

 

i) थंड प्रदेशात हिवाळ्यात वातावरणाचे तापमान 0°C पेक्षाही खूप खाली जाते. त्या वेळी तलावाचे पाणी गोठते. पृष्ठभागावरील पाण्याचे तापमान 4°C. झाले की, त्या पाण्याचे आकारमान कमीत कमी झाल्याने ते जड होऊन तळाशी जाते व तळातील पाणी वा येते. सर्व पाण्याचे तापमान 4 °C होईपर्यंत ही क्रिया चालू राहते. 

ii) नंतर पृष्ठभागाजवळील पाण्याचे तापमान कमी कमी होत पृष्ठभागावर बर्फाचा थर तयार होतो. बर्फ उष्णतेचा दुर्वाहक असल्यामुळे तळाशी 4°C तापमानाचे पाणी राहुन त्यात मासे जिवंत राहू शकतात.




Previous Post Next Post