ब्रिटिश व्यापारी भारतातून अफू आणून चीनमध्ये विकत होते. चिनी सरकारचा अफूच्या व्यापारास विरोध होता. युरोपीय व्यापारी अफूचा चोरटा व्यापार करीतच राहिले. चिनी लोक चादीच्या मोबदल्यात अफू विकत घेऊ लागले. त्यामुळे चादीच्या ओघ इग्लडकडे जाऊ लागला. अफूच्या व्यापारातून चीन झाले. त्याला ‘ अफूचे पहिले युद्ध ‘ म्हणतात. या युद्धात चीनचा पराभव होऊन माचू राज्यसत्तेला इग्रजाशी तह करावा लागला. इ. स. १८४२ मध्ये चीन व इग्रज याच्यातील तहाला ‘ नानकिंगचा तह ‘ म्हणतात. त्या तहनुसार इग्लडला कॅन्टन बदराशिवाय इतर चार बंदरे व्यापारासाठी खुली करण्यात आली. हॉगकॉग बेटही इग्रजाना मिळाले. त्याचात फायदा घेऊन पुढील दहा वर्षात अमेरिका, फ्रान्स, बेल्जियम, हॉलंड, पोर्तूगाल, रशिया राष्ट्रानी चीनकडून व्यापारासाठी सवलती मिळवल्या.